१५ मध्यम आकाराच्या वडया
वेळ: ५० ते ६० मिनीटे
आवरणासाठी:
१/२ कप मैदा
१/२ कप बेसन
२ टिस्पून धणे-जिरेपूड
१ टिस्पून तिखट
१/२ टिस्पून हळद
२ टेस्पून तेल
सारण:
१ टिस्पून खसखस, भाजून पूड
१ मध्यम कांदा, बारीक चिरून
५ लसूण + १ इंच आले + ५ मिरच्या सर्व ठेचून घेणे
१/२ कप सुक्या खोबर्याचा किस, भाजून चुरडून घ्यावे.
३ कोथिंबीर जुड्या, निवडून धुवून घ्यावी. (निवडल्यावर साधारण २ ते अडीच कप)
चवीपुरते मिठ
१ टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून तेल
तेलाचे मिश्रण:
१ टेस्पून तेल + १ टिस्पून गोडा मसाला
कृती:
१) कोथिंबीर निवडून धुवून पंच्यावर पसरून पूर्ण कोरडी होवू द्यावी नाहीतर वड्या लगेच मऊ पडतात. कोथिंबीर कोरडी झाली कि बारीक चिरून घ्यावी.
२) कांदा १ टिस्पून तेलात खरपूस परतून घ्यावा. ताटात कोथिंबीर, परतलेला कांदा, खसखसपूड, तिखट, धणे-जिरेपूड, आले-लसूण-मिरचीचा ठेचा असे सर्व मिक्स करून सारण तयार करावे.
३) मैदा आणि बेसन एकत्र करावे. त्यात धणे-जिरेपूड, तिखट, हळद, आणि २ टेस्पून गरम तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चवीपुरते मिठ घालून पाण्याने घट्ट मळून घ्यावे. २० मिनीटे झाकून ठेवून द्यावे.
४) मळलेल्या पिठाचे लिंबाएवढे गोळे करून अंडाकृती आकारात पातळ लाटून घ्या. गोडामसाल्याचे मिश्रण थोडेसे मध्यभागी लावून त्यावर साधारण २ चमचे सारण लांबट आणि त्रिकोणी आकारात चेपून ठेवावे. दोन्ही मोठ्या बाजू एकावर एक अशा ठेवून चिकटवाव्यात. नंतर छोट्या बाजू फोल्ड कराव्यात. व्यवस्थित बांधून घ्यावी नाहीतर तळताना उंडा सुटून सारण बाहेर येईल.
५) तेल गरम करून मंद आचेवर उंडे खरपूस तळून घ्यावे. कापून गरमा-गरम सर्व्ह करावे.
स्टेप बाय स्टेप फोटोंसाठी इथे क्लिक करा
Labels:
Pudachya Vadya, cilantro stuffed puffs
No comments:
Post a Comment