वेळ: १० मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
१० ब्रेडचे स्लाईसेस
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी: २ चिमटी मोहोरी, १ चिमटी हिंग, १/८ टीस्पून हळद, ४-५ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून (किंवा २ सुक्या लाल मिरच्या मोडून)
१/४ कप कांदा, बारीक चिरून
चवीपुरते मीठ आणि साखर
कोथिंबीर सजावटीसाठी
१ टीस्पून लिंबाचा रस
कृती:
१) ब्रेडच्या स्लाईसेसचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यावे. किंवा हातानेच तुकडे करावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, हळद, आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. हिरव्या मिरच्या आणि कांदा घालून परतावा.
३) कांदा परतताना मीठ घालावे आणि कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
४) ब्रेडचे तुकडे घालून २ चिमटी साखर पेरावी.
५) झाकण ठेवून मिडीयम आचेवर २-३ मिनिटे वाफ काढावी.
लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करावे.
टीपा:
१) ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालतो.
No comments:
Post a Comment