Bharli masala Bhendi in English
साहित्य:
२३ ते २५ कोवळी भेंडी (मध्यम आकाराच्या)
१/२ कप कांदा, उभा चिरून
१ टेस्पून जिरेपूड, १ टेस्पून धणेपूड, १ टिस्पून आमचूर पावडर
१/४ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मिठ
फोडणीसाठी:
३ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
४-५ कढीपत्ता पाने
सजावटीसाठी कोथिंबीर
कृती:
१) भेंडी स्वच्छ घुवून, पुसून घ्यावी. भेंडीची देठं कापून घ्यावीत. प्रत्येक भेंडीला एका बाजूने चिर द्यावी पण दोन तुकडे करू नयेत.
२) जिरेपूड, धणेपूड, हळद, लाल तिखट आणि आमचुर पावडर एका लहान वाडग्यात एकत्र मिक्स करून घ्यावे. चवीपुरते मिठ घालावे. हे तयार मिश्रण प्रत्येक भेंडीमध्ये भरावे. तसेच भेंडी या मिश्रणात थोडी घोळवून घ्यावी. अशाप्रकारे सर्व भेंडी तयार कराव्यात. उरलेला मसाला नंतरच्या वापरासाठी ठेवून द्यावा.
३) नॉनस्टिक पॅन गरम करावा. त्यात ३ टेस्पून तेल घालून गरम होवू द्यावे. नंतर मोहोरी, जिरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा फोडणीस घालावा.
४) कांदा अर्धा शिजला कि त्यात भरलेली भेंडी घालावी. हलक्या हाताने, भरलेला मसाला बाहेर पडू न देता मिक्स करावे. ज्यामुळे तेल सर्व भेंडीला लागेल. गॅस एकदम मंद ठेवावा आणि वरून झाकण ठेवून भेंडी शिजू द्यावी. दर तीन ते चार मिनीटांनी भाजी हलक्या हाताने ढवळावी.
५) भेंडी शिजत आली कि उरलेला मसाला गरजेनुसार घालावा व लागल्यास किंचीत मिठ भुरभूरवावे.
गरम गरम भरली भेंडी पोळीबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) वाफ काढताना गरज वाटल्यास, भेंडीच्या बाजून एखादा चमचा तेल सोडावे.
Labels:
Masala Bhendi, Bhindi Masala, bhindi fry
Tuesday, December 16, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment