Batata Puri in English
In India, Sabudana or Sago has a unique importance during Fasting. Khichdi, Vada, Kheer (Pudding) , Thalipith (Pancakes) made of Sabudana taste just amazing. Sabudana Vada is favorite in India, especially in Maharashtra because of its delicious taste and crispy texture.
Batata Puri (Potato Puri) is a version of Sabudana Vada. But Batata Puris are more crispy than Sabudana Vada. This recipe would be a nice alternative who fasts once in a week and searching something new to try other than routine fasting food.
उपवासाला आपण घरी साबुदाणे वडे बर्याचदा करतो, बटाटापुरी हि साबुदाणा वड्याच्या साहित्यापासूनच बनवली जाते पण पदार्थांचे प्रमाण आणि पद्धत थोडी निराळी असते. तसेच चवीलाही थोडी वेगळी आणि खुसखूशीत लागते. नक्की करून पाहा !!
वाढणी: मध्यम १२ पुर्या
साहित्य:
२ मोठे बटाटे, उकडलेले
१/२ कप साबुदाणा
७ ते ८ मिरच्या
१/४ कप कोथिंबीर, चिरून
१/२ टिस्पून जिरे
३ टेस्पून शेंगदाणा कूट
१ टिस्पून जिरेपूड
१ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप)
चवीपुरते मिठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे. साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.
२) मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये. जर मिक्सर नसेल तर मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
३) शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे.
४) साधारण दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते. (टीप)
५) पुरी तेलात टाकल्यावर ती झार्याने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. पुरी जरा तळली गेल्यावर थोडा firmness येतो. त्यावेळी झार्याने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल.
तळलेल्या पुर्या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
टीप:
१) पुरी तेलात टाकल्यावर तुटत असेल तर मळलेल्या पिठात एखादा चमचा शिंगाडा पिठ वाढवावे.
२) शिंगाडा पिठ घरात available नसेल आणि उपवासही नसेल तर शिंगाड्याऐवजी तांदूळाचे पिठ वापरले तरी चालते.
३) साबुदाणा खुप चिकट भिजवू नये, पुर्या तळताना त्या तेलात विरघळतात.
4) तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचे प्रमाण कमीजास्त करावे.
Thursday, December 18, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment