Dal Makhani in English
Dal Makhani is a delicacy from Punjab in India. This Dal is cooked in lot of Butter and taste great. (Dal - Cooked Lentils and Makhani (Makkhan in hindi) - Butter)
Traditionally this dal was cooked slowly, for hours, on charcoal. This gave it a creamier texture. Traditionally cooked in a Punjabi houses, it had ‘malai’ (thick creamy skin that forms on top of milk) or fresh butter added to it. Dal Makhani can be served with Paratha, Naan, Roti or even Rice.
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप अख्खे उडीद, सालासकट
१/४ कप राजमा (रेड बिन्स)
३ टेस्पून आलेलसूण पेस्ट
२ + २ बटर
१ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून हळद
२ मध्यम टॉमेटो
१ टिस्पून गरम मसाला पावडर किंवा खडा मसाला (२ लवंगा, २ वेलची, १ तमालपत्र, १ लहान दालचिनीचा तुकडा)
१/२ कप कांदा, बारीक चिरून
२ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
१/२ टिस्पून कसूरी मेथी
१/२ कप दूध
चवीपुरते मिठ
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) उडीद आणि राजमा धुवून ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावे. प्रेशर कूकरमध्ये भिजवलेले उडीद आणि राजमा दुप्पट पाणी घालून मऊसर शिजवून घ्यावेत. साधरण ४ ते ५ शिट्ट्या कराव्यात.
२) टॉमेटो प्युरीसाठी एक खोलगट पॅनमध्ये टॉमेटो बुडतील इतपत पाणी गरम करावे. त्यात २ टॉमेटो घालून २ मिनीटे उकळवावे आणि बाहेर काढून थंड होवू द्यावेत. साले आणि बिया काढून टाकाव्यात उरलेला भाग आणि थोडे पाणी मिक्सरमध्ये घालून प्युरी करून घ्यावी.
३) खोलगट पॅनमध्ये बटर घालून मध्यम आचेवर वितळू द्यावे. त्यात जिरे, हळद घालावी. [जर अख्खा गरम मसाला घालणार असाल तर तो आत्ता घालावा. काही सेकंद परतावे.]
४) आलेलसूण पेस्ट आणि लाल तिखट घालावे. काही सेकंद परतून त्यात चिरलेला कांदा घालून परतावे. कांदा निट परतल गेला कि टॉमेटो प्युरी घालून मध्यम आचेवर, पॅनवर झाकण ठेवून ५ ते ७ मिनीटे शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
५) धणे-जिरेपूड घालावी आणि ढवळावे. शिजवलेले उडीद आणि राजमा घालावे. थोडावेळ मॅश करावे. गरजेपुरते पाणी घालून मधम आचेवर उकळी काढावी.
६) जर तुम्ही आख्खा गरम मसाला घातला नसेल तर आता गरम मसाला पावडर घालावी. नंतर कसूरी मेथी, मिठ आणि आमचूर पावडर घालून ढवळावे. अजून थोडे पाणी घालून घट्टपणा अड्जस्ट करावा. पॅनवर झाकण ठेवून २० ते २५ मिनीटे कमी आचेवर शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे, डाळ पॅनच्या तळाला चिकटू देवू नये.
७) २ टेस्पून बटर घालून अजून १० मिनीटे वाफ काढावी. १० मिनीटांनी १/२ कप दूध घालावे आणि ढवळावे. परत झाकण ठेवून मध्यम आचेवर ५ मिनीटे वाफ काढावी.
गरम दाल मखनी कोथिंबीरीने सजवून रोटी, नान, किंवा भाताबरोबर सर्व्ह करावे.
Labels:
Dal Makhani, Malai Dal, Punjabi Dal Makhani
Thursday, December 11, 2008
दाल माखनी - Dal Makhani
Labels:
A - E,
Amati/Saar/Kadhi,
Every Day Cooking,
Kadadhanya,
Main Dish,
North Indian
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment