वाढणी: २ जणांसाठी
वेळ: १३ ते २० मिनीटे
१ कप पातळ चिरलेली फरसबी (गोल चकत्या)
१ हिरवी मिरची
१/२ ते १ टिस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून दाण्याचा कूट
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर (साधारण १/२ टिस्पून)
कृती:
१) पातळ चिरलेली फरसबी कूकरमध्ये पाणी न घालता वाफवून घ्यावी. (टीप १)
२) मिरची बारीक चिरून त्यात चिमटीभर मिठ घालावे आणि मिरची व्य्वस्थित चुरडून घ्यावी.
३) वाफवलेली फरसबी एका वाडग्यात घ्यावी त्यात चुरडलेली मिरची, दाण्याचा कूट, नारळ, कोथिंबीर, मिठ, साखर घालून मिक्स करावे. चव पाहून कमी असलेला जिन्नस आवडीप्रमाणे घालावा.
जेवणात हि कोशिंबीर तोंडीलावणी म्हणून छान लागते.
टीप:
१) 'फरसबी पाणी न घालता शिजवावी' म्हणजे कूकरच्या तळाशी १ भांडे पाणी घालावे. तळाशी कूकरची जाळी असेल तर ती ठेवावी. कूकरच्या आतील डब्यात चिरलेली फरसबी ठेवावी व या डब्यात पाणी घालू नये. कूकर लावून साधारण १ ते २ शिट्ट्यांवर फरसबी शिजू द्यावी.
२) फोडणी न घालता ही कोशिंबीर छानच लागते, पण जर तुम्हाला जिर्याची फोडणी घालायची असेल तर, कढल्यात तूप गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालून हि फोडणी तयार कोशिंबीरीत घालावी. आणि चमच्याने छान मिक्स करावे.
३) आवडत असल्यास थोडे दही घातले तरी छान चव येते. दही घातल्यास किंचीत मिरचीचे प्रमाण वाढवावे.
Labels:
Farasbi koshimbir, Maharashtrian Koshimbir recipes, Raita recipes
No comments:
Post a Comment