वेळ: १० ते १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
२ कप भात (शक्यतो बासमती)
२ मोठे टोमॅटो, बारीक चिरून
३ ते ४ मोठ्या लसूण पाकळ्या, मध्यम तुकडे
२ टेस्पून तेल किंवा तूप, २ चिमटी जिरे, १/८ टीस्पून हिंग, २ हिरव्या मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ
कोथिंबीर बारीक चिरून
१) कढईत तूप गरम करून त्यात सर्वात आधी लसूण घालावी. मोठ्या आचेवर परतावे. लसणीच्या कडा गडद ब्राऊन झाल्या पाहिजेत आणि लसणीचा कच्चा वास जावून छान सुगंध आला पाहिजे.
२) लसूण परतली गेली कि जिरे, हिंग, हिरवी मिरची आणी कढीपत्ता घालून थोडावेळ फ्राय करावे.
३) चिरलेले टोमॅटो फोडणीस घालावे, बरोबर मीठही घालावे. झाकण ठेवून मोठ्या आचेवर परतावे. टोमॅटो पूर्ण मऊ होउन कडेने तेल सुटले पाहिजे.
४) यात शिजलेला भात मोकळा करून घालावा आणि मिक्स करावे. टोमॅटोचा तयार मसाला सर्व भाताला व्यवस्थित लागला पाहिजे. झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे मध्यम आचेवर वाफ काढावी.
कोथिंबिरीने सजवून गरमच सर्व्ह करावे.
टीपा:
१) हिरव्या मिरच्यांऐवजी लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकतो.
२) लसूण व्यवस्थित परतली गेली पाहिजे (करपू देउ नये). जर लसूण कच्ची राहिली तर तेवढी चांगली चव भाताला येत नाही.
३) ताजे, लाल, आणि पूर्ण पिकलेले टोमॅटो वापरावेत. त्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते.
४) आवडीप्रमाणे गरम मसाला घालू शकतो. चव छान लागते. पण गरम मसाल्याने टोमॅटोचा स्वाद नाहीसा होतो.
No comments:
Post a Comment