Wednesday, August 22, 2007

शेजवान फ्राइड राईस - Schezwan Fried Rice

Schezwan Fried Rice in English

Indo Chinese recipe, fried rice recipe, Chinese fried rice recipe, schezwan fried rice recipe, chinese cuisine, indochinese cuisine
साहित्य:
३/४ कप तांदूळ (बासमती किंवा साधा)
पाउण कप कांदा उभा चिरून
४ काड्या पाती कांदा - पाती बारीक चिरून (थोडा पाती कांदा वरून गार्निश करायला बाजूला काढून ठेवावा)
पाउण कप कोबी बारीक उभी चिरून
पाव कप गाजराचे तुकडे
पाव कप फरसबीचे तुकडे (थोडीशी शिजवून घ्यावी)
१ टेस्पून सोयासॉस
दिड टिस्पून व्हिनीगर (आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालावे)
चवीनुसार शेजवान सॉस
१ टेस्पून तेल
चवीनुसार मीठ

शेजवान सॉस कृती

शेजवान सॉस कृती

कृती:
१) भात : तांदुळाच्या अडीचपट ते तीन पाणी घ्यावे, त्यात १/२ टिस्पून तेल आणि पाऊण चमचा मीठ घालून मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. त्यात तांदूळ घालावे. वरुन झाकण ठेवून तांदूळ शिजू द्यावे. तेलामुळे भात मोकळा होतो. उरलेले पाणी काढून घ्यावे. आणि तयार भात परातीत मोकळा करून गार करत ठेवावा.
२) पाती कांदा सोडून चिरलेल्या भाज्यांना थोडा शेजवान सॉस लावून घ्यावा.
३) नॉनस्टिक फ्राईंग पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करावे. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात भाज्या घालाव्यात. १ ते २ मिनीटे परतावे. अगदी शेवटी पाती कांदा घालावा आणि १५ ते २० सेकंदानी भाज्या काढून घ्याव्यात.
४) तोच फ्राईंग पॅन चांगला तापू द्यावा व त्यात १ चमचा शेजवान सॉस घालून त्यात तयार भात घालावा. मध्यम गॅसवर ठेवूनच चांगला परतावा. त्यात थोडे मीठ घालावे. व्हिनीगर आणि सोयासॉस घालावा.
५) भात कढईत असताना मध्यम आचेवर भातामध्ये परतलेल्या भाज्या घालाव्यात व चांगले मिक्स करावे. २ मिनीटे परतावे. चायनीजच्या गाडीवर तुम्ही बघितलेच असेल. :)

टीप :
१) नॉनस्टिक फ्राईंग पॅनऐवजी लोखंडी कढई असेल तर स्वाद छान येतो. भाज्या आणि भात चांगला परतला जातो.
२) जर लसणीचा फ्लेवर जास्त हवा असेल भाज्या परतायच्या आधी तेलात १/२ चमचा लसूण पेस्ट परतावी आणि मग भाज्या घालाव्या.

Labels:
Indo Chinese Food, Chinese Rice, Fried Rice recipe, Vegetable Fried Rice, Shezwan fried rice

No comments:

Post a Comment