Paneer Makhani in English
२ ते ३ जणांसाठी
वेळ: ३५ ते ४० मिनीटे
साहित्य:
२५० ग्राम पनीर
१/४ कप कांद्याची पेस्ट (टीप ५)
अर्धा ते पाऊण कप टोमॅटो प्युरी (टीप २)
१ टिस्पून आलेलसूण पेस्ट
१ टेस्पून काजूची पेस्ट
अख्खा गरम मसाला - ४ मिरीदाणे, १ तमाल पत्र, १ वेलची, २ लवंगा, १ लहान दालचिनीचा तुकडा
२ चिमटी कसूरी मेथी
१ टिस्पून धणेजिरेपूड
१/२ टिस्पून गरम मसाला
१ टिस्पून लाल तिखट
३ टेस्पून बटर
३ टेस्पून क्रिम किंवा एवेपोरेटेड मिल्क (टीप)
चवीपुरते मिठ
कृती:
१) पनीरचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे किंवा २ इंचाचे लांबडे तुकडे करा. तेलामध्ये डिपफ्राय किंवा शालोफ्राय करून घ्या. (टीप ४)
२) अख्खा गरम मसाल्याचे जे जिन्नस आहेत ते अगदी हलके, कोरडेच भाजून घ्यावे. खलबत्त्यात हे सर्व मसाले एकत्र कुटून घ्यावे.
३) पॅनमध्ये २ टेस्पून बटर गरम करावे. त्यात कुटलेला मसाला घालून काही सेकंद परतावे.
४) त्यात कांद्याची पेस्ट आणि आलेलसूण पेस्ट घालावी. मध्यम आचेवर कांदा शिजेस्तोवर परतावे. (साधारण ४ ते ५ मिनीटे)
५) कांदा शिजला आणि थोडा रंग बदलला कि टोमॅटो प्युरी घालून मध्यम आचेवर काही मिनीटे शिजवावे.
६) टोमॅटो प्युरी शिजल्यावर त्यात कसूरी मेथी, धणेजिरेपूड, गरम मसाला पावडर, लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
७) आच एकदम मंद करावी. काजू पेस्ट आणि क्रिम घालून जोरजोरात ढवळावे म्हणजे क्रिम फुटणार नाही. थोडे बटर घाला.
एकदा क्रिम निट मिक्स झाले कि तळलेले पनीर घालावे. साधारण ३० सेकंद मंद आचेवर गरम करावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये भाजी वाढून त्यावर थोडे क्रिम घालून सजवावे.
पोळी किंवा नान बरोबर सर्व्ह करावे.
टीपा:
१) व्यवस्थित पिकलेले आणि लालबुंद टोमॅटो वापरावेत.
२) टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी, टोमॅटो काचेच्या भांड्यात ठेवावे (साधारण ३-४ मध्यम). टोमॅटो बुडेस्तोवर पाणी घालावे आणि मायक्रोवेव्हमध्ये ४ ते ५ मिनीटे शिजवावे. नंतर टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटावे आणि तयार प्युरी चाळणीतून गाळून घ्यावी.
३) जर क्रिम किंवा एवेपोरेटेड मिल्क नसेल तर १/२ ते ३/४ कप मिल्क पावडर घ्यावी त्यात साधारण १/४ कप पाणी घालून दाटसर मिश्रण बनवावे. हे मिश्रण क्रिमऐवजी वापरले तरीही चालते.
४) जर पनीर तळायचे नसेल तर गरम पाण्यात पनीरचे तुकडे काही मिनीटे बुडवून ठेवावे. पनीर छान मऊसर होते.
५) कांद्याच्या पेस्टऐवजी कांदा पातळ उभा चिरून घ्यावा व तेलात चांगला खरपूस तळून घ्यावा. हा तळलेला कांद मिक्सरमध्ये बारीक वाटून मग वरीलप्रमाणेच कृती फॉलो करा.
Labels:
Paneer makhanwala, paneer makhani, butter paneer, paneer butter masala.
Thursday, May 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment