Tuesday, May 25, 2010

चवळी आमटी - Chawli Amti

Chawli Amti in English

वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे (चवळी भिजलेली असल्यावर)

black eyed beans, chawli amti, chavli amti, chawlichi usal, chavlichi usal, chawlichi amti, Indian curry, vegetarian healthy recipesसाहित्य:
१/२ कप चवळी
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, प्युरी करून
२ लसूण पाकळ्या, सोलून
फोडणीसाठी: ३ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १ हिरवी मिरची, ४ कढीपत्ता पाने, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ ते १ टिस्पून कांदा लसूण मसाला
१ टिस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून + १ टिस्पून सजावटीसाठी
चवीपुरते मिठ

कृती:
१) चवळी साधारण ३ तास कोमट पाण्यात भिजवावी. कूकरमध्ये १ ते २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी.
२) कढईमध्ये ३ पैकी २ टिस्पून तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
३) कांदा परतल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. मध्यम आचेवर काही मिनीटे शिजू द्यावी. टोमॅटोचा कच्चा वास गेला आणि टोमॅटो शिजला कि शिजलेली चवळी घालावी. कपभर पाणी घालून ढवळावे. नंतर कांदा लसूण मसाला, चिंचेचा कोळ, नारळ आणि मिठ घालावे.
४) गरज पडल्यास पाणी वाढवून पातळपणा अडजस्ट करावा. मध्यम आचेवर काही मिनीटे उकळी काढावी.
आमटी तयार झाली कि कढल्यात १ टिस्पून तेल गरम करावे. त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात आणि चिमूटभर हिंग घालावे. हि फोडणी आमटीवर घालावी. आमटी ढवळून कोथिंबीरीने सजवावी आणि गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) या आमटीमध्ये भरीला उकडून सोललेला बटाटा फोडी करून घालावा आणि थोडावेळ उकळी काढावी.
२) हि आमटी गोडा मसाला वापरूनही करता येते. त्यासाठी कांदालसूण मसाला न वापरता गोडा मसाला वापरावा आणि जोडीला २ टिस्पून किसलेला गूळ घालावा.

Labels:
Chawli Amti, Chavlichi amti, चवळीची आमटी, black-eyed beans curry

No comments:

Post a Comment