Sevai (vermicelli) Upma in English
वाढणी: २ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे
साहित्य:
दिड कप शेवया (उपमा शेवई) [मी Bombino च्या शेवया वापरल्या होत्या]
१ ते सव्वा कप गरम पाणी
१ टेस्पून तूप
फोडणीसाठी: चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/२ टिस्पून उडीद डाळ, १/२ टिस्पून किसलेले आले
२ ते ३ हिरव्या मिरच्या, चिरलेल्या
३ ते ४ कढीपत्ता पाने
१/४ कप गाजर, एकदम लहान चौकोनी तुकडे
१/४ कप मटार, फ्रोजन
२ टेस्पून तळलेले शेंगदाणे / भाजलेले शेंगदाणे
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती:
१) पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात शेवया मध्यम आचेवर गोल्डन रंग येईस्तोवर परताव्यात.
२) भाजलेल्या शेवया पॅनमधून काढाव्यात. उरलेल्या तूपात फोडणीसाठी मोहोरी, जिरे, हिंग, उडीद डाळ, मिरच्या, आले आणि कढीपत्ता घालून परतावे.
३) तयार फोडणीत गाजराचे तुकडे आणि मटार घालून परतावे. २ वाफा काढून मध्यम आचेवर शिजवावे.
४) आता तळलेले शेंगदाणे आणि परतलेल्या शेवया घालाव्यात. मिनीटभर परतावे. आच मध्यम ठेवावी.
५) गरम पाण्यातील अर्धे पाणी घालावे. चवीनुसार साखर आणि मिठ घालावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर शेवया शिजू द्याव्यात. पाणी शोषले गेले उरलेले गरम पाणी गरजेनुसार घालून शेवया व्यवस्थित शिजू द्याव्यात.
कोथिंबीरीने सजवून गरमागरम शेवयांचा उपमा सर्व्ह करावा.
टीप:
१) शेंगदाण्याबरोबर/ ऐवजी थोडे काजूचे तुकडे घातल्यास छान चव येते.
२) हा उपमा कांदा घालून आणि कांद्याशिवायही छान लागतो. मी शक्यतो कांदा घालत नाही, पण घालायचा असेल तर वरील प्रमाणासाठी १/४ कप बारीक चिरलेला कांदा फोडणीत घालून परतावा. तसेच फरसबीचे तुकडे वा इतर आवडीच्या भाज्याही घालता येतील.
Labels:
sevai Upma, Vermicelli upma, Vermicelli pulav
Thursday, May 13, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment