२ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे
४ आदल्या दिवशीच्या पोळ्या (चपात्या)
१ कप शिजलेला भात (आदल्या दिवशीचा)
फोडणीसाठी: २ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने
२ टेस्पून शेंगदाणे
२ ते ३ टेस्पून मटार
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ टिस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मिठ
१/२ टिस्पून साखर
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेला नारळ
कृती:
१) पोळ्यांचा हाताने कुस्कारा करून घ्यावा किंवा मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे. भात हाताने मोकळा करून घ्यावा.
२) कढईत तेल गरम करून आधी त्यात शेंगदाणे परतून घ्यावे. नंतर त्यातच मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. त्यात कांदा आणि मटार घालून परतावे. अंदाजे मिठ घालावे.
३) कांदा निट परतला गेला गॅस मध्यम करून त्यात भात घालावा. निट मिक्स करून बारीक केलेल्या पोळ्या घालून निट परतावे. साखर घालून १ वाफ काढावी. लिंबाचा रस चवीनुसर घालावा.
कोथिंबीर आणि ओल्या खोबर्याने सजवावे. गरमागरम सर्व्ह करावे.
labels:
phodnicha bhat, phodnichi poli, fodani chi poli
No comments:
Post a Comment