Garlic bread in English
वेळ: साधारण १५ मिनीटे
१० ब्रेड स्लाईस
साहित्य:
१ फुट, फ्रेंच ब्रेडचा लोफ
कोशर मिठ किंवा साधे मिठ चवीप्रमाणे
२ ते ३ चिमटी ड्राय हर्ब्स (मी रोजमेरी आणि ओरेगानो वापरले होते)
गार्लिक बटर बनवण्यासाठी
४ टेस्पून बटर
१ टेस्पून ऑलिव ऑईल
५ लसणीच्या पाकळ्या, बारीक किसलेल्या
कृती:
१) ओव्हन ४०० F वर प्रिहीट करावे.
२) ब्रेड आडवा कापून दोन तुकडे करावे.
३) गार्लिक बटर स्प्रेड बनवण्यासाठी बटर १० सेकंद मायक्रोवेवमध्ये गरम करावा. उकळी येऊ देवू नये, फक्त बटर नरम होईल इतपतच गरम करावे. नंतर यात ऑलिव ऑईल आणि किसलेले लसूण घालून निट मिक्स करावे.
जर तुमच्याकडे मायक्रोवेव नसेल तर लहान पातेल्यात मध्यम आचेवर ऑलिव ऑईल कोमट करावे. त्यात बटर आणि किसलेले लसूण घालून व्यवस्थित मिक्स करावे.
४) तयार गार्लिक स्प्रेड ब्रेडच्या आतील पांढर्या भागावर लावावा तसेच डाव्या-उजव्या कडांनाही लावावा. ओरेगानो बोटांनी चुरगाळून पावावर भुरभूरावा. ५ ते ८ मिनीटे बेक करावे किंवा कडा लाईट ब्राऊन होईस्तोवर बेक करावे. चवीपुरते मिठ भुरभूरावे.
कटींग बोर्डवर बेक केलेला ब्रेड ठेवावा आणि धारदार सुरीने कापावा. १ ते दिड इंचाच्या स्ट्रिप्स कराव्यात. गार्लिकब्रेड जनरली, टोमॅटो पास्ता सॉसबरोबर सर्व्ह करतात पण नुसताही छान लागतो.
टीप:
१) स्प्रेड लावण्यापुर्वीही तुम्ही ब्रेडचे स्लाईस करू शकता. पण, त्यासाठी जास्त स्प्रेड बनवावा लागेल कारण प्रत्येक स्लाईसच्या ३ पांढर्या कडांना बटर स्प्रेड लावावा लागेल. तसेच ब्रेड स्ट्रिप्स जास्त बटर लावल्याने खुपच बटरी लागतील.
Labels:
Garlic Bread, Homemade garlic bread sticks
Thursday, May 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment